पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे गुरुवारी वितरण – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर
कोल्हापूर, दि. 26 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून गुरुवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
या समारंभाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे आणि कृषी विज्ञान केंद्र, कणेरीमठ, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, राजर्षी शाहू कृषी महाविद्यालय, सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प शेंडा पार्क, ग्रामपंचायत स्तरावरुन तसेच तालुक्यातील गावोगावी कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याकडून होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ वितरण समारंभामध्ये http://pmindiawebcast.nic.in या लिंक व्दारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिवेकर यांनी केले आहे.
Hurrah! After all I got a webpage from where I be capable of truly take valuable data regarding my study and knowledge.