कागल /प्रतिनिधी : कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी लाकडी तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. कृष्णात बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याच्या पश्चात आई व वडील आहेत.
Advertisements
आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. कागल पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे .पुढील तपास पोलीस नाईक औताडे हे करीत आहेत.
Advertisements

AD1