आम. हसन मुश्रीफ यांचा कॅबिनेट मंत्री पदी शपथविधी कागल मध्ये जल्लोष

कागल : आमदार हसन मुश्रीफ यांचा कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर कागल शहरातील गल्ली बोळात फटाक्यांची आतषबाजी करत आज गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Advertisements

शहरातील गैबी चौक, खर्डेकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात, नेहरू चौक येथे गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Advertisements

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने हादरले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि. 2) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Advertisements

त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

Leave a Comment

error: Content is protected !!