मुरगूड ( शशी दरेकर ) – पुणे येथील आंतरराष्ट्रीय दिर्घायु केंद्र भारत यांच्या वतीने मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या सहकार्याने मुरगूड येथे संघाच्या विरंगुळा केंद्रात दि .७व ८ जून २०२३ रोजी जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या क्रार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं श्री. गजानन गंगापूरे हे होते.
प्रारंभी संघाचे संचालक श्री. अशोक डवरी यानी पाहुण्यांचे, प्रशिक्षणार्थीचे स्वागत केले व पाहुण्यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करणेत आले . संघाचे संचालक श्री. जयवंत हावळ यानीं जेष्ठ नागरीक संघाच्या कार्याची माहिती विशद करून कार्यक्रमाचा उद्देश कथन केला . या कार्यक्रमाचे उदघाटन संघाचे उपाध्यक्ष श्री .पी. डी . मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटनानंतर कार्यक्रम समन्वयक श्री. सुशांत सोनवणे व त्यांच्या सहकारी सौ. यशोधा पाध्ये व श्री. नंदकुमार सकट यानीं उपस्थित प्रशिक्षणार्थीनां मोबाईल संबंधी तांत्रीक ज्ञान , मोबाईलचा वापर, मोबाईल कसा हाताळायचा, विविध अँपचा वापर याबाबत शास्त्रोक्त व प्रात्यक्षिकाव्दारे माहिती दिली व उपस्थितामधील शंकांचे निरसन केले.
आंतरराष्ट्रीय दिर्घायु-केंद्र भारत या संस्थेने हे प्रशिक्षण विनाशुल्क घेतले असून दोन दिवसाचा चहापान- नाष्टयाचा खर्चही संस्थेने केला . यावेळी प्रशिक्षणार्थीनां मोबाईल प्रशिक्षणार्थीसाठी उपयुक्त पुस्तिकेचे मोफत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडलयाबद्दल जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने कार्यक्रम समन्वयक श्री . सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जयवंत हावळ यानींआभार मानले. कार्यक्रमास जेष्ठ नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.