कागल(विक्रांत कोरे): शनिवारी रात्री उशिरा शार्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत येथील परफेक्ट कॉम्प्यूटर टायपिंग इन्स्टिट्यूट जळून खाक झाले. या आगीत इन्स्टिट्यूटमधील ३० कॉम्प्युटर, महत्वाची कागदपत्रे, सर्टिफिकेट व फर्निचर आदी साहित्य जळून भस्मसात झाले.
कागल येथील सुजाउद्दीन सय्यद यांचे निपाणी वेशीजवळ ब्रम्हाकुमारी केंद्रालगत परफेक्ट टायपिंग कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे. ३१डिसेंबर १९८१ रोजी या संस्थेचे कामकाज सुरू झाले. शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना टायपिंगचे शिक्षण देणारी कागल शहरातील सर्वात जुनी संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते.
जुन्या मशिनवर शिकून नोक-या मिळविल्या. सध्या या संस्थेत सुधारणा करून ३० संगणक कार्यरत आहेत. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संस्था बंद करुन सर घरी होते.शनिवारी रात्रीच्या सुमारास धुर बाहेर आला. परिसरात धुराचा वास येऊ लागल्यामुळे संस्थेच्या परिसरातील लोक घराबाहेर आले. त्याचवेळी आगीने रौद्ररूप धारण केले.
संगणक या आगीत संगणक कक्षातील सर्व ३० संगणक, बॅटरी बॅकअप तसेच कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे, फर्निचर जळून खाक झाले. संस्थेचे अंदाजे २०लाखाचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे .प्रचंड नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होतआहे.नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्यांनी ही आज विझविण्यात यश मिळविले.
या संस्थेत शिक्षण घेऊन अनेकजण उच्च पदावर पोहोचलो आहेत किंबहुना आपले संसार उभारले आहेत.आज सय्यद सरांना भेटण्यासाठी आलेल्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.