कागल / प्रतिनिधी :
शैक्षणिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोल्हापूरच्या आनंदगंगा फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील विद्या मंदिर कणेरीवाडीच्या शिक्षिका स्वप्नाली प्रदीप कतगर (राहणार- सुळकुड तालुका -कागल) यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
या पुरस्काराने पुढील कार्यास निश्चितच प्रेरणा मिळाली आहे असे सांगत सौ कतगर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रामध्ये कालानुरूप बदल स्वीकारणे गरजेचे आहे .सैनिक परीक्षा, एम एम एन एस परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा ,सातारा सैनिक परीक्षा, यासारख्या परीक्षांमधून विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होत असतो, सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यामध्ये, शिक्षक -पालक यांचा महत्त्वाचा वाटा असतो. माझ्या आज पर्यंत मिळालेल्या यशामध्ये माझे पती प्रदीप कतगर सर, कतगर परिवार, विद्यामंदिर कणेरी वाडीचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमास हातकणंगले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जे टी पाटील, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, उद्योजक राहुल सावंत, संजय घोडावत विद्यापीठ ट्रस्टी विनायक भोसले, आनंदगंगा फाउंडेशनचे संस्थापक तानाजी पवार, विराट गिरी, सागर माने आदि मान्यवर उपस्थित होते.