मुरगूड ( शशी दरेकर ) – शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा सुधारला पाहिजे . गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्हयातील प्राथमिक शाळांना निधी मिळवून देण्यास कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले.
दौलतवाडी (ता . कागल ) येथे विरेंद्र भोसले युवा फौंडेशनच्या वतीने प्राथमिक शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण सहाय्यक संचालक सुभाष चौगले, गटशिक्षणाधिकारी डॉ गणपत कमळकर, युवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेंद्र भोसले प्रमुख उपस्थित होते.
खासदार मंडलिक म्हणाले , कागल तालुक्यातील बहुतांश शाळांच्या इमारतींचा प्रश्न गंभीर आहे . संबधित शाळांच्या इमारत दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठवा आपण त्याचा पाठपुरावा करून निधी मिळवून देवू अशी ग्वाही दिली.
माजी सरपंच श्रीकांतराव भोसले आपल्या प्रास्ताविकात म्हणाले , शिक्षकांनी शिक्षणातील बदल लक्षात घेवून ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करीत विद्यार्थ्यात गुणवत्ता निर्माण करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्रज्ञा शोध, स्कॉलरशीप परीक्षे बरोबरच देशांतर्गत होणाऱ्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक व देशात ३९ वे स्थान प्राप्त केल्याबद्दल अरिंजयसिंह विजयेंद्र भोसले याचा खासदार मंडलिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
कार्यक्रमास संभाजीराव भोसले , हळदीचे सरपंच दिपक कुंभार, निवृत आरोग्य विस्तार अधिकारी सुखदेव जाधव , प्रा. बाजीराव पाटील , कागल गट शिक्षणाधिकारी डॉ . कमळकर , सौ. विजयश्री भोसले, कऱ्हाड विद्यानगरीतील लिगाडे – पाटील आदि उपस्थित होते .विनय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर विरेंद्रसिंह भोसले यांनी आभार मानले.