मॅट वरील कब्बडी स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत १६ संघ होणार सहभागी
मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने हनुमान तरूण मंडळ भडगाव ता.कागल यांच्या वतीने कै.एच.एस.पाटील स्मृति चषक मॅटवरील खुल्या गटातील कब्बडी स्पर्धा ३० एप्रिल ते एक मे कालावधीत होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. प्राथमिक शाळेच्या क्रीडांणणावर स्पर्धा दोन दिवस प्रकाशझोतात होणार असून जिल्हातील नामवंत १६ संघाना निमंत्रित केले असून क्रीडाशैकिनासाठी बसण्यासाठी गॅलरी व्यवस्था केली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार १५ हजार १० हजार व आकर्षक चषक व स्पर्धेतील उत्कृष्ट पकड. उत्कृष्ट चढाई.उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी प्रवेश फी ५००रूपये राहिल. या स्पर्धेत प्रो-कब्बडी स्पर्धेत खेळलेल्या नामवंत खेळाडूंचा समावेश रहाणार आहे. या वेळी अमोल पाटील.हणमंत पाटील. पाटील.हणमंत दाभोळे.कुंडलिक पाटील, रघुनाथ चव्हण.संदीप सदाशिव पाटील.महदेव पाटील.निकेश पाटील.सुनिल.पाटील.उपस्थित होते.