मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ( ता. कागल ) येथिल समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड व मुरगूड नगरपरिषद कामगार यांच्या वतीने ” विकास सावंत ” सर यानां श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली होती.
निढोरीसह मुरगूड परिसरात सामाजिक चळवळीशी त्यांचा निकटचा सबंध होता. तरुण तडफदार, पुरोगामी विचारांचा वारसदार, शिक्षण प्रेमी, अभ्यासू व्यक्तिमत्व, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे अंनिसच्या माध्यमातून बीज रुजवण्यास सातत्याने पुढाकार घेऊन कोणत्याही चुकीच्या प्रथेला कृतीतून त्यानी विरोध केला अशा विकास सावंत सरांच्या अचानक जाण्याने फार मोठी हानी झाली आहे.
या शोकसभेत डी. डी. चौगले, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष बबन बारदेस्कर, सचिव समीर कटके, पांडूरंग पाटील यानी सावंत सरांच्या आठवणीनां उजाळा देऊन श्रध्दांजली वाहिली.
यावेळी शोकसभेस बी. एस. खामकर, पी .एस. पाटील, शाहू -फर्नांडिस, राणोजी रजपूत, मोहन कांबळे, भिकाजी कांबळे, बंडा कांबळे, विजय कांबळे, रणजित कदम, विष्णू कांबळे, सतीश कांबळे, ओंकार म्हेतर, समाजवादी प्रबोधिनीचे पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.