कागल एमआडीसीमध्ये वीज पडल्याने बगॅसला आग

पन्नास लाखांचे नुकसान

कागल (प्रतिनीधी) : कागल पंचतारांकित एमआयडीसीतील – ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बग्यास डेपोमध्ये पहाटे तीनच्या सुमारास वीज पडल्याने आग लागली. १४५७ मॅट्रिक टन बगॅस जळून खाक झाला आहे.

Advertisements

सुमारे ५० लाखाहून अधिक रकमेचे यामध्ये नुकसान झाले आहे. डाव्या कालव्या शेजारी खासगी माळावर सुमारे ३० एकर परिसरात या कंपनीचे बगॅसचे ३५ डेपो आहेत. यामधील डेपो नंबर ९ मधील बगॅसच्या डेपोवर वीज पडली.

Advertisements

बगॅसने पेट घेतल्याने धुराचे लोट पसरले होते. रात्रीपासूनच आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचारी वर्गाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कागल नगरपरिषद, कोल्हापूर महानगरपालिका, स्वामी पाणीपुरवठा, कागल औद्योगिक वसाहत, जवाहर साखर कारखाना आदींच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!