हुपरी : बहुचर्चित हुपरी शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. तो पालिका, नगररचन विभाग (कोल्हापूर), मंडल अधिकारी व नगर भूमापन कार्यालय येथे पाहायला उपलब्ध असून, त्यावरील नागरिकांच्या सूचना हरकत आराखड्याची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यावर ३० दिवसांच्य आत विचारात घेतल्या जाणार आहेत.
शहरातील मोकळ्या जागा तसेच शेतजमिनी यावरील आरक्षणाच प्रारूप विकास आराखड्यात समावेश असून, जमिनीवर आरक्षण पडण्याच्या भीतीने अल्पभूधारक, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक धास्तावले आहेत. २६ फेब्रुवारी २०२१ ला झालेल्या पालिकेच्य सर्वसाधारण सभेत शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच ठराव मंजूर झाला. राज्य शासनातर्फे त्याबाबतची अधिसूचना २४ जू २०२१ ला राजपत्रात प्रसिद्ध झाली. पालिकेत सध्या प्रशासक राज्य आहे. मुख्याधिकारी विशाल पाटील प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. अखेरीस तीन महिन्यांनी त्यांनी हा प्रारूप विकास आराखड नागरिकांसाठी खुला केला