कागल : कागल तालुक्यामध्ये होणार चक्काजाम आंदोलन शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी केलेल्या आव्हानानुसार शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रोत्साहन अनुदान, दिवसा दहा तास विज मिळावी, विज दरवाढी विरोधात, ऊस तोडणी मुकादमा कडुन होणारी लूट, खतांचे वाढते दर या विविध प्रश्ना संदर्भात कागल तालुक्यामध्ये ‘नदी किनारा आणि लिंगनुर कापशी’ या दोन ठिकाणी बुधवार २२ फेब्रुवारी १२ वा. “चक्काजाम आंदोलन”होणार आहे.
सदर ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आक्रोश दाखवून द्यावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या कडून करण्यात आले.
कागल येथे झालेल्या तालुका बैठकीच्या वेळी करण्यात आले. या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, तालुका अध्यक्ष बाळासो पाटील, उपाध्यक्ष नामदेव भराडे, शिवाजी कळमकर, कागल शहराध्यक्ष राजेंद्र बागल, तालुका कमीटी सदस्य संभाजी यादव, प्रभू भोजे, चौगुले सर यांच्या सह प्रमुख कार्यकर्तेच्या उपस्थितत होते.