पिंपळगांव खुर्द : चंद्रकांत पाटील यांनी महापुरुशाच्या बद्दल अवमानकारक वक्तव्याबद्दल पिंपळगाव खुर्द ता कागल याठिकाणी कागल निढोरी महामार्ग रोखुन निषेध नोंदविण्यात आला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरून महापुरुषांची अहवेलना केली. सदर बाब ही निंदनीय असून गावातील तरुण एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी पाटील यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी महामार्ग काही काळ रोखून धरण्यात आला. तसेच पाटील यांच्या निषेधार्थ काळे झेंडे घेत तरुणांनी घोषणा दिल्या व पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली.