मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड तालुका कागल येथील सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेली व दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 46 वी ऑनलाईन सर्वसाधारण सभा येथील शिवराज विद्यालय मुरगुड येथे संस्था चेअरमन श्री. दत्तामामा सोनाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत पार पडली, प्रारंभी संचालक वीरेंद्र मंडलिक यांच्या शुभहस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज व स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून सभेस सुरुवात करण्यात आली यावेळी संस्था सभासदांच्या गुणवंत पाल्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र वीरेंद्र मंडलिक व संचालक मंडळ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले तसेच अहवाल सालात संस्थेचे दिवंगत सभासद ,हितचिंतक ,व थोर नेते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी वीरेंद्र मंडलिक यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन श्री दत्तात्रय सोनाळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्था व्यवस्थापक श्री डी एन पाटील यांनी अहवाल वाचन केले यावेळी बोलताना चेअरमन दत्तात्रय सोनाळकर म्हणाले अहवाल सालात संस्थेस 81 लाख 17 हजार 623 इतका विक्रमी नफा झाला असून सभासदांना 15 टक्के लाभांश जाहीर केला आहे अहवाल सालात 356 कोटी 81 लाखाचा संस्थेने विक्रमी व्यवसाय केला असून संस्थेकडे 60 कोटी 89 लाखांच्या ठेवी असून योग्य तारणावर 35 कोटी 91 लाख कर्ज वाटप केले असून त्यापैकी 11 कोटी 41 लाख सोनेतारण कर्ज आहे अहवाल सालात ऑडिट वर्ग अ आहे तसेच संस्थेने हायरपर्चस कर्ज व सोनेतारण कर्जासाठी 12 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा केला आहे तसेच सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यास ऊस तोडणी वाहतुकीसाठी कर्जपुरवठा केला आहे सभासदांनी विचारलेला प्रश्नांना चेअरमन व व्यवस्थापक यांनी समर्पक उत्तरे दिली वीरेंद्र मंडलिक यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत मनोगत व्यक्त करून समाधान व्यक्त केले.
सभेस श्री मारुती रावण, दिगंबर परीट, नामदेवराव मेंडके, राजेश गोधडे, नामदेव चौगले यांनी चर्चेत सहभाग घेतला
यावेळी संस्थेचे संचालक श्री एन वाय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर श्री प्रदीप चव्हाण व आनंदा पाटील यांनी आभार मानले