मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल मुरगूड नगरपरिषदच्या प्रांगणात छ . शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालून ” शिवप्रताप दिन ” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राजेखान जमादार म्हणाले प्रत्येक मावळ्यांचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना १० नोव्हेंबर १६५९ रोजी घडली . स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करून आलेल्या आदिलशाहीचा बलाढय सरदार अफजलखानचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला . हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षरात लिहावा असा आहे. या दिवसाची आठवण म्हणून १० नोव्हेंबर हा दिवस ” शिवप्रताप दिन ” म्हणून आपण साजरा करतो . छ . शिवाजी महाराजांचे विचार , त्यांचे बुद्धीकौशल्य आपण सर्वानी आचरणात आणले पाहिजेत.
यावेळी मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी घार्गे साहेब , जयवंत हावळ (सर), रणजित सुर्यवंशी , शिवभक्त धोंडीराम परीट ,यानीं मनोगत व्यक्त केली. या ” शिवप्रताप दिनानिमित्य माजी नगरसेवक विशाल सुर्यवंशी, अमर सणगर, जयवंत हावळ, रवि परीट, बाजीराव नलगे, शशी दरेकर , निवास कदम , प्रविण रणवरे, आशिष मोर्चे, बबन बारदेस्कर, पांडूरंग पाटील, प्रकाश सणगर, रघुनाथ सुर्यवंशी, सुरेश गिरी यांच्यासह शिवप्रेमी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक धोंडीराम परीट यानीं तर आभार विकी साळोखे यानीं मानले.