कागल : साके येथे नवीन स्मशानशेड बांधकाम करावे, चिखली येथील रखडलेले स्मशानशेड बंधकाम पूर्ववत चालू करावे व कागल तालुक्यातील काही गावातील दलित समाजातील प्रेतांवर आजही उघड्यावर अंतिम संस्कार होतात याकरिता त्यांना मुख्य स्मशानभूमी खुली करावी अथवा त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मशानशेड व्यवस्था करावी या मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कागल तालुका वतीने तालुका नेते व क्रियाशील पक्ष सदस्य आयु रमेश कांबळे (RB) यांनी कागल चे गट विकास अधिकारी यांना एक महिन्यापूर्वी दिले होते व मागण्या मान्य न झाल्यास 01 नोव्हेंबर 2022 पासून कागल पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसणेचा इशारा दिला होता.
यापैकी साके व चिखली येथील मागण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्या सोबत चर्चेअंती व लेखी आश्वासनानंतर मान्य झालेने मागे घेणेत आल्या. पण तिसरी मागणी ही गट विकास अधिकारी कागल यांचे कार्यकक्षेतील असलेने यावर कोणतीही चर्चा झाली नसलेने नाविलाजास्तव आमरण उपोषणावर ठाम राहून तिसऱ्या मागणी संदर्भात लक्ष वेधण्यासाठी आज रिपाइंच्या वतीने मंगळवार दिनांक 01 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 पासून आयु रमेश कांबळे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु केले होते.
यामध्ये पोलिस प्रशासनाने गट विकास अधिकारी यांना उपोषणकर्त्यांच्या या मागणी बाबत कळवून याबाबत आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढावा अशी भूमिका घेतली व उपोषणकर्ते व गट विकास अधिकारी यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली. आंदोलकांची भूमिका समानतेची व न्यायाची असलेने सार्वजनिक स्मशानभूमी ही कायद्याने सर्वाना खुली असून त्यामध्ये अंतिम संस्कार करण्यावाचून कोणासही रोखता येणार नाही, अथवा मज्जाव करता येणार नाही व यापूढे तालुक्यातील कोणत्याही समाजाचे प्रेतांवर उघडयावर अंतिम संस्कार होण्याची वेळ येऊ नये यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने स्मशानभूमी बाबत कडक अंमलबजावणी करावी.
यामध्ये हयगय होणार नाही याबाबत ग्रामसेवक पोलिस पाटील यांना लेखी पत्राने कळवले, तसेच अद्यापही ज्या ज्या गावात स्मशानभूमी नाही अशा गावांची यादी प्रशासनास दयावी, प्रशासनाकडून त्या गावांसाठी नवीन स्मशानशेड उभारणी साठी शासना कडे प्रस्ताव पाठवू असेही आश्वासित केले. तसेच सर्व ग्रामसेवकांची मिटिंग घेऊन अंमलबजावणी बाबत कडक सूचना केले जातील असे सांगितले. गट विकास अधिकारी मा.सुशील संसारे यांनी यांनी अंमलबजावणी कार्यवाहीचे लेखी पत्र दिलेने सदरचे आमरण उपोषण मागे घेणेत आले. यावेळी पोलिस प्रशासनाचे हस्ते उपोषणकर्ते आयु रमेश कांबळे यांनी सरबत प्राशन करून आमरण उपोषण मागे घेतले.
या आमरण उपोषण आंदोलनात रिपाइं चे जिल्हा नेते मा. सतिश माळगे दादा, सामाजिक कार्यकर्ते शशीकांत कांबळे, प्रदीप कांबळे, विकास कांबळे, सचिन कांबळे, सागर कांबळे, सचिन कदम, दत्ता कांबळे, दीपक कांबळे, संजय कांबळे, नवलू बंडगर, विशाल कांबळे, दिलीप कांबळे, प्रदीप कांबळे, यासह कार्यकर्ते सहभागी होते. विविध पक्ष संघटना, कार्यकत्रे, पदाधिकारी यांनी आंदोलनास भेट देऊन लेखी पाठिंबा दर्शवला.