मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड (ता. कागल) येथिल सर्वांच्या परिचयाची सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह .पतसंस्थेच्या संचालकपदी श्री . किशोर पोतदार यांची विनविरोध निवड झालेबद्दल श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री . किशोर पोतदार म्हणाले सभासदांचे हित व संस्थेची निरपेक्ष वाटचाल डोळ्यापुढे ठेऊन मी कार्यरत राहीन.
यावेळी श्री .व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर यानीं .पोतदार यांच्या अनेक चांगल्या कामांचा उहापोह करून अभिनंदन केले .व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर , श्री . हाजी धोंडिबा मकानदार , श्री . प्रशांत शहा , श्री . साताप्पा पाटील, श्री. शशिकांत दरेकर, श्री. प्रदिप वेसणेकर, श्री. नामदेवराव पाटील, श्री . यशवंत परीट, श्री. महादेव तांबट, श्री. सुरेश जाधव, श्री. प्रकाश सणगर, शिवाजी तांबट, दत्तात्रय नेसरीकर, कार्यलक्षी संचालक सुदर्शने हुंडेकर, संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.