मुश्रीफसाहेब आमच्या चिमुकल्यांसाठी तुम्हीच झालात देवदूत
कागल, दि. ५ : लहानपणापासून विविध व्याधीग्रस्त बालके आणि त्यांची सैरभैर झालेली कुटूंबे पाहिली तेंव्हाच मनोमन शपथ घेतली की, आयुष्यात यापुढे सत्ता असो वा नसो, या बालकांच्या चेहर्यावरील हसू आणि त्यांच्या कुटूंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद कधीही मावळू द्यायचा नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने मुंबई येथे पंचतारांकित रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया झालेल्या तीस लहान मुलांच्या पालकांनी कृतज्ञताप्रती आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी उपस्थित पालकांनी मंत्री मुश्रीफांमुळेच आमच्या मुलांना पुनर्जन्म मिळाला अशा भावना व्यक्त केल्या.
शस्त्रक्रिया झालेल्या मुलांच्या पालकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, लहान मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हंटले जाते, आणि ते खरे आहे. निरागस लहान बालके घरात असतात तेंव्हा जगाला विसरुन त्यांच्यात रमण्यात जो आनंद असतो त्याची उपमा दुसर्या कशालाही देता येणार नाही. परंतू दुर्देवाने काही अभागी मुलांना जन्मतःच किंवा जन्मानंतर काही गंभीर आजार जसे हृदयाला छिद्र पडलेले असणे किंवा मेंदूशी संबंधित आजार असतात तेंव्हा त्या बालकांच्या चेहर्यावरील निरागस हास्य लोप पावते. या आजाराचे निदान झाल्यावर त्या बालकाचे आई – वडील धीर देऊन त्यांच्यावर मोफत उपचार करून आणणे ही माजी जबाबदारी आहे.
स्वागत गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी केले. कार्यक्रमास जि. प. सदस्य व गोकूळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने,
मला तारणहार नव्हे , तर मुलांचा आजोबा व्हायला आवडेल – मानवी स्वभावच असा आहे की, माणूस आपल्या मुलापेक्षा नातवंडांवर जास्त प्रेम करतो. याबाबत आपल्या पूर्वजांनी केलेल्या म्हणीप्रमाणे माणूस दुधापेक्षा दुधाच्या सायीला जास्त जपतो. आजपर्यंत माझ्या हातून ज्या बालकांवर उपचार करण्याचे भाग्य मला मिळाले त्यांनी मला देवदूत, तारणहार, मसीहा अशा उपमा दिल्या. परंतु या सर्वांपेक्षा मला या बालकांचा आजोबा व्हायला आवडेल आणि यापेक्षा आणखी कोणताही मोठा आनंद माझ्यासाठी नसेल.