मडिलगे ( जोतीराम पोवार) : निवृत्ती धारक शिक्षकांनी निवृत्तीनंतर कुटुंबा बरोबरच समाजकार्यासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरूच ठेवावे असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी केले. ते वाघापूर ता. भुदरगड येथील वाघापूर हायस्कूल चे मुख्याध्यापक अशोक मारूती बरकाळे यांच्या सेवानिवृत्त सपत्निक सत्कार गौरव समारंभ व मानपत्र वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी स्थानिक देवस्थान समितीचे अध्यक्ष अरविंद जठार होते यावेळी आसगांवकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांत सुरु असलेली इ-लर्निंग सुविधा सुरळीत राहावी याकरिता प्रत्येक शाळेत सौर ऊर्जा प्रकल्प चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगून वाघापूर हायस्कूल चे नाव अटल लॅब समावेशा बरोबर प्राथमिक शाळेला दर्जेदार क्रीडा साहित्यासाठी सात लाख रुपये मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार
यावेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बरकाळे यांची स्नूषा सौ नंदिनी बरकाळे यांची जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान सत्कार मूर्ती अशोक बरकाळे यांनी आपल्या मनोगतात 35 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षण सेवेतील आठवणींना उजाळा दिला यावेळी मानपत्राचे वाचन डॉ. एस. बी. शिंदे यांनी केले तर माजी शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील, गट शिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे, मुख्याध्यापक संघ कोल्हापूरचे व्हा. चेअरमन मिलिंद पांगिरेकर,व्ही. व्ही. कुराडे, पत्रकार अर्जुन दाभोळे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास भुदरगड पंचायत समितीच्या सभापती सौ आक्काताई नलवडे, केदारलिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ, जी. व्ही. पाटील, माजी सभापती बापूसो आरडे, बिद्री चे संचालक अशोक कांबळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, तानाजी कुरडे, धनाजी कुरडे, एम.डी. जठार, किरण कुरडे, श्रीपती दाभोळे, अण्णासो घाटगे, एकनाथ जठार, कोंडीबा जठार, कामगार सेलचे अध्यक्ष बाळासो शिंदे, सुशील जठार, संदीप जठार, मुख्याध्यापक संघ भुदरगडचे अध्यक्ष के.ए.देसाई, शिक्षक संघटना भुदरगड चे अध्यक्ष मारुती लाड, नंदकुमार पाटील, केंद्रप्रमुख विनायक चौगुले, ग्रामसेवक तानाजी शिंदे, तलाठी के.एम. जरग, धनाजी बरकाळे, तानाजी बरकाळे, शशिकांत बरकाळे, अभिजीत बरकाळे, वाघापूर हायस्कूल चे सर्व शिक्षक, शिक्षिका, आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ. एस. बी. शिंदे, अर्जुन दाभोळे यांनी प्रास्ताविक एस. के. पोवार यांनी तर आभार शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य वाय. बी. शिंदे यांनी मानले