मुरगूड ( प्रतिनिधी ) : मुरगूडचा अस्सल स्वाद हरपला !, आचारी शामा सुतार या नावाने मुरगूड परिसरातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा परिचय होता.
मांसाहारी जेवण म्हटले कि शामा सुतार असे एक समीकरण होते. या समीकरणानेच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

अतिशय मनमिळावू स्वभाव . कोणत्याही परिस्थितीसी तडजोड करणारा व जमवून घेणारा गोरगरीबांच्या जेवणापासून श्रीमंताच्या पंगतीपर्यंत शामा सुतार यांची चव पोहचलेली असा अस्सल कोल्हापूरी बाण्याचा आचारी आपल्या चविष्ट भोजनातून त्यांनी वेगळीच ख्याती निर्माण केली होती . त्यांच्या स्वादिष्ट चवीचा वारसा आता त्यांचा मुलगा अरुण व नातू चालवत आहे . त्यांच्या त्या आठवणी व चर्वीच्या स्मृती नेहमी कायमपणे सर्वांच्या ध्यानी मनी राहतील.
अशा दुसऱ्यांचे मन तृप्त करणाऱ्या आचारी शामराव सुतार यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त आहे. रक्षाविसर्जन रविवार दि .२९ / ११ / २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे .