मुरगूड ( शशी दरेकर ) : जयसिंगपूर कॉलेजचे संशोधक प्रथमेश सुखदेव चौगले (मुरगूड ) यांची चीनमधील शियांगतान विद्यापीठात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे.
जयसिंगपूर कॉलेज आणि शियांगतान विद्यापीठ चीन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाच्या माध्यमातून ही निवड झाली आहे.

चीनमधील शियांगतान विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत प्रथमेश चौगले संशोधक ऊर्जा आणि पर्यावरण या महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन करीत आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी चीन सरकार आणि शियांगतान विद्यापीठाकडून आर्थिक सहकार्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या संशोधन कार्यासाठी त्यांना जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ. संदीप साबळे, डॉ. विकास जाधव तसेच शियांगतान विद्यापीठाचे प्रा. जियान शेन यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तर संशोधन उपक्रमासाठी माजी खास. संजय मंडलिक , गोकूळ संचालक विरेंद्र मंडलिक ,जयसिंगपूर कॉलेज लोकल कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्रा. बी. एम. सरगर , संस्थेचे पदाधिकारी , शियांगतान विद्यापीठाचे प्रा. जियान शेन,प्रा.किओंगझी झोऊ ,विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा.यान हुआंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
.