निढोरीच्या सागर चितळे यांची खुल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत पदकांची लयलूट

मुरगुड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील सागर बळवंत चितळे यांनी मैदानी क्रीडा प्रकारामध्ये तब्बल चार पदकांची कमाई करत स्पर्धेमध्ये पदकांची अक्षरशः लयलूट केली.

Advertisements

   नाशिक येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी सातव्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स २०२६या  ४० वर्षावरील वयोगटामध्ये खुल्या गटातील स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सागर चितळे यांनी १oo मीटर धावणे स्पर्धेत ब्रांझपदक, २०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये सिल्व्हर पदक, ४०० मीटर अडथळा शर्यतीमध्ये सिल्व्हर पदक आणि ४x १०० मीटर रिले शर्यतीमध्ये सिल्व्हर पदक असा पदकांचा चौकार ठोकला.त्यांच्या या यशामुळे सागर यांची नागपूर येथे संत तुकडोजी महाराज यूनिवर्सिटी मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय राज्य मास्टर गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यास संधी मिळणार आहे.          

Advertisements

त्यांना या स्पर्धेमध्ये सुभाष पवार यांचे मार्गदर्शन तर वैभव कळमकर, सतीश कळमकर, सुरज कोळी व सुरेश लोंढे मार्गदर्शन तसेच वडील बळवंत, आई मंगल, पत्नी गीता यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

सागर यांच्या खात्यावर ५७ पदके

      २०१५ पासून राष्ट्रीय पातळीवर २८ सुवर्ण १७ रौप्य आणि ८ कास्य अशी तब्बल ५३ पदकांची कामगिरी करणाऱ्या चितळे यांच्या खात्यावर पुन्हा नव्या ४ पदकांची भर पडल्यामुळे पदकांची संख्या आता ५७ झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!