कागल शहरात दीपावली आणि उरुसाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी काटेकोर नियोजन करा: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल शहरात दीपावली सण आणि ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुसासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने सर्व सुविधांचे काटेकोर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या एका व्यापक बैठकीत ते बोलत होते.

Advertisements

बैठकीतील प्रमुख मुद्दे व सूचना: वाहतूक आणि रस्ते व्यवस्था: दीपावली व उरसाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी. राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण असलेले सर्व्हिस रोडचे काम दिवाळीच्या अगोदर (येत्या ८ तारखेपर्यंत) तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.

Advertisements

उड्डाणपूल व दुभाजक: कागल शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांची विशेष काळजी घ्यावी. आवश्यक तिथे रस्ते दुभाजक बसवावेत आणि माहितीसाठी योग्य ठिकाणी सूचना फलक लावावेत.

पाणीपुरवठा व स्वच्छता: शहरात सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाने सतर्क राहून योग्य त्या सुविधा पुरवाव्यात. नगरपालिकेच्या अखत्यारीतील महामार्गाला जोडणाऱ्या ड्रेनेज लाईन व वाहतुकीचे योग्य नियोजन करावे.

अखंडित वीज पुरवठा: महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दीपावली व उरसादरम्यान शहरात विद्युत पुरवठा अखंडित आणि सुरळीत राहील याची पूर्ण दक्षता घ्यावी.

पोलिसांना विशेष सूचना: पंचायत समिती समोरील बोगदा, कागल बस स्थानक जवळील बोगदा आणि आरटीओ चेक पोस्टकडील बोगदा या सर्व प्रमुख ठिकाणांसह सांगव, निपाणी वेस आणि मुरगुडकडून शहरात येणाऱ्या वाहतुकीचे चोख नियोजन करावे, अशा सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

या बैठकीस कागलच्या नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप माने, सर्व नगरसेवक, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता महेश पाटोळे, प्रकल्प संचालक सोनी, कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!