सर्जा-राजा ही ग्रामीण जीवनाच्या वास्तवाचा वेध घेणारी कथा -प्रा. पी. एस. पाटील

मुरगूड (शशी दरेकर) : सर्जा-राजा ही कथा ग्रामीण जीवनाच्या वास्तवाचा वेध घेणारी कथा आहे. या कथेमध्ये ग्रामीण जीवनातील शेतकरी कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी येते. असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. पी. एस. पाटील यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन निमित्त वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘माझे कथाकथन’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

Advertisements

महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाटील पुढे म्हणाले की, आजचे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी वाचनाकडे दुर्लक्ष केले आहे.

Advertisements

जर विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची असेल आणि सर्जनशील लेखन करायचं असेल तर वाचन केले पाहिजे. याप्रसंगी त्यांनी स्वतःची ‘सर्जा-राजा’ ही ग्रामीण जीवनावर भाष्य करणारी कथा कथन केली. ग्रामीण जीवनातील कष्ट, दारिद्र्य यातून शेतकरी कुटुंबाची होणारी ससेहोलपट, आणि पशु जीवनाशी असणारा नात्यांचा बंध, यातून उलगडत जाणारे भावनिक ऋणानुबंध यामुळे ही कथा प्रेक्षकांना अधिक हृदय स्पर्शी करून गेली.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, वाचन संस्कृतीचे जतन करणे ही आजच्या काळाची मूलभूत आणि महत्त्वाची अशी गरज आहे. सध्या सर्वत्र ग्रंथालय ओस पडत चालली आहेत. जर समाज सुसंस्कृत व्हायचा असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालकांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे. आणि वाचन संस्कृती टिकवली पाहिजे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्जुन कुंभार उपस्थित होते.

Advertisements

    प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी पाहुण्यांच्या परिचय करुन दिला. तर स्वागत डॉ. सुखदेव एकल यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ.एम. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागचा हेतू कथन केला. कार्यक्रमाचे आभार डॉ.अशोक पाटील यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. अर्चना कांबळे यांनी केले.

      या प्रसंगी प्रा. दादासाहेब सरदेसाई, प्रा. दीपक साळुंखे, प्रा. एच.एम. सोहणी, प्रा. सोहम डाफळे, प्रा. आर. एस. पाटील, प्रा.नुतन बिरबोळे, प्रा. दिगंबर गोरे,  प्रा. सुशांत पाटील, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. धनाजी खतकर, प्रा. गुरूनाथ सामंत, प्रा. राकेश माने, प्रा. संदीप मोहिते,  प्रा. राम पाटील, प्रा. नितेश रायकर, प्रा. अवधूत पाटील प्रा. राहुल बोटे, डॉ. सोनाली कुंभार तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!