मुरगूड येथिल मेडिकल व्यावसाईक मोहन ढेरे यांचे निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मेडिकल व्यावसायिक मोहन महादेव ढेरे ( वय ५४ वर्षे )  रा. शिंदेवाडी ता. कागल यांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या कुटूंबीयांनी दिली.

Advertisements

            काल सकाळपासून त्यांना अशक्तपणा आणि अंगात ताप भरला होता. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने कोल्हापूरच्या खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचार चालू असतानाच त्यांचे आज दुपारी त्यांचे देहावसान झाले. नेहमी हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या ढेरे यांची मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व मेडिकल व्यावसायिकांशी जवळीक होती. त्यांच्या अकस्मित निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.   

Advertisements

    ते येथील श्रद्धा मेडिकल स्टोअरचे मालक आणि कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सहसचिव पदावर कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात आई, वडील ,पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शिंदेवाडी ता. कागल येथे शुक्रवारी दि. १५ रोजी सकाळी ९ वा. आहे .

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!