चौंडाळ येथिल विहिरीत पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

मुरगूड ( शशी दरेकर ):

    चौंडाळ (ता. कागल) येथे एका विहिरीत पडून अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मुरगूड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात
आली आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इसम हिंदी बोलणारा असून तो चौंडाळ परिसरात वास्तव्यास असलेल्या व्यक्ती व त्यांच्या टोळीतील लोकांसोबत राहत असल्याची माहिती आहे.
    दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजल्यापासून ते दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत तो चौंडाळ येथील बाळासो हरी पाटील यांच्या विहिरीत पडून मृत झाला.

Advertisements


   
     दि. ३० सप्टेंबर रोजी मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजि. नं. ५१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल १९७ कुंभार करीत आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोहेकॉ ३१९ गुरव यांनी काम पाहिले. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!