जिल्हा शल्य चिकित्सक सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर व ग्रामीण रुग्णालय मुरगूड कडुन  ३८ नागरिकांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया

रुग्णांना सांगली येथे नेण्यात आले

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड, ता. कागल दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ अखेर सेवा संकल्प अभियान अंतर्गत  ग्रामीण रुग्णालय मुरगूडच्या वतीने राष्ट्रीय अंधत्व व द्ष्टीक्षिणता नियंत्रण  कार्यक्रम अंतर्गत महेश वालावलकर व व्यकटेश हावळ  नेत्र चिकित्सा अधिकारी यांनी  ११८ नागरिकांची मोतिबिंदू तपासणी शिबिरात निदान झालेल्या  ३८ नागरिकांना दिनांक. २९ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आय हॉस्पिटल, सांगली येथे पाठविण्यात आले.

Advertisements

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण कंदाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी  यांनी  रुग्णांची नोंदणी, तपासणी  केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत औषधे, चष्मा  देखील देण्यात येणार आहे.

Advertisements

डॉ. प्रवीण कंदाडे सर म्हणाले, “दृष्टी हा सर्वात मोठा खजिना आहे. वृद्ध नागरिकांनी मोतिबिंदूची लक्षणे दिसल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे दर मंगळवार व दर शुक्रवार या दिवशी संपर्क साधावा. शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार उपलब्ध आहेत.”
या उपक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय मुरगूड मधील  डॉ. शिवाजी घुमरे, डॉ. शैलेश पाटील, डॉ. गवळी, डॉ सचिन जिरगे, डॉ. कुंभार, डॉ. गोखले वैद्यकीय अधिकारी, पल्लवी अडसुळे इनचार्ज सिस्टर, विनायक साठे, रुपाली पाटील, महेश जाधव व सर्व परिचारीका, सर्व  कर्मचारी, व श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आय हॉस्पिटल सांगलीचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले .

Leave a Comment

error: Content is protected !!