मुरगूड विद्यालय मुरगूड संघाची जिल्हास्तरीय कबड्डीसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) – एकोंडी तालुका कागल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत येथील शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगूड मधील १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या दोन संघांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Advertisements

       या खेळाडूंना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई अध्यक्षा शिवानीताई देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन डॉ. मंजिरी मोरे युवा नेते,पेट्रन मेंबर दौलतराव देसाई प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील प्राचार्य एस पी पाटील उपप्राचार्य विराजीत घोरपडे उपमुख्याध्यापिका यु.सी. पाखरे तंत्र विभाग प्रमुख पी.बी लोकरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक डी.जे परीट, एम एच खराडे, श्यामली डेळेकर पर्यवेक्षक ए.एन.पाटील या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisements

     १४ वर्षाखालील कबड्डी संघामध्ये शिवम परीट, प्रज्वल कांबळे, राजवर्धन जाधव, सुदर्शन कांबळे, सुमित पाटील, सोहम मोरबाळे, स्वरूप मगदूम, हर्षद पाटील यांचा तर १७ वर्षाखालील कबड्डी संघामध्ये अथर्व कांबळे, समर्थ कुंभार, विश्वभर करण, विरेन साबळे, रोहन वड, राजवर्धन तिकोडे, प्रेमराज कापडे, प्रथमेश गोरूले, उन्मेष चव्हाण, आयुष गायकवाड, अथर्व कांबळे व केदार पाटील यांचा समावेश होता.

    या दोन्ही संघांचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!