बसव ब्रिगेड कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी संजय चितारी; अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी भोजराज पाटील यांची नियुक्ती

सोलापूर: बसव ब्रिगेड परिवारात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी कागलचे अभ्यासू माजी नगरसेवक संजय बसवराज चितारी यांची तर अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी निस्सीम बसवभक्त भोजराज पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Advertisements

शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर येथे लिंगायत प्रतिनिधीची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांच्या शिफारशीनुसार बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अविनाशभाऊ भोसीकर यांनी या महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा केली.

Advertisements

राज्यस्तरीय बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीस बसव ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोषजी वायचळ, ऑल इंडिया वीरशैव लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष विरेंद्रजी हिंगमिरे, बसव ब्रिगेड नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख संतोषजी घोडके, विश्वनाथजी बिडवे, प्रा. दयानंद भोरे, इरेश खुने, गणेश नरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष जतिन निमगाव, सांगोला तालुकाध्यक्ष स्वप्नील नष्टे, वीरशैव सेवा संघाचे सिद्धारूढ निंबाळे, जागतिक लिंगायत महासभेचे डॉ. भीमाशंकर सिदंगी, राजेंद्र हौदे, राजेंद्रकुमार खसगी, जिल्हा कार्याध्यक्ष बसवराज चाकाई, भीमाशंकर व्हनाजे, शहर उपाध्यक्ष सिद्धांत रंगापुरे, शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, प्रसिद्धी प्रमुख दत्ता केरे, अमरनाथ दामा, शिवकुमार पाटील, अजय हालोळी, बागेश बिराजदार यांच्यासह महाराष्ट्रातील लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय चितारी आणि भोजराज पाटील यांच्या नियुक्तीबद्दल बसव ब्रिगेड परिवार व लिंगायत समाजबांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!