मुरगूड ( शशी दरेकर ) : शंकर पाटील हे मराठी ग्रामीण कथेतील दीपस्तंभ होते असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते ते मंडलिक महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त केलेल्या ‘ग्रामीण कथाकार शंकर पाटील’ या भित्तिपत्रकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
आपल्या मनोगत ते पुढे म्हणाले की, शंकर पाटील यांनी गावगाड्यातील मानवी मनाचे अनोखे दर्शन आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले. त्यांच्या साहित्यामधून कोल्हापूरच्या प्रादेशिक बोलीचे वेगवेगळे नमुने पहावयास मिळतात. त्यांनी मराठी कथेला एका उंचीवर नेण्याचे काम केले. ग्रामीण जीवनातील पात्रांच्या माध्यमातून विनोदी प्रसंग उभे केलेच त्याबरोबरच त्यांनी ग्रामीण माणसाच्या व्यथा वेदनाही नाही तितक्याच ताकदीने मराठी साहित्यातून पुढे आणल्या. मराठी कथाविश्वात आणि साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी लेखनाची वेगळी शैली निर्माण केली त्यामुळे शंकर पाटील हे लोकप्रिय लेखक म्हणून आजही वाचले जातात.

या कार्यक्रमासाठी लेखक आणि चित्रकार संदीप मुसळे उपस्थित होते या व्यक्तिपत्रकाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सुखदेव एकल यांनी केले तर आभार प्रा. नूतन बीरंबोळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील न्याक समन्वयक प्रा. माणिक पाटील स्टाफ सेक्रेटरी प्रा. दादासाहेब सरदेसाई प्रा. दीपक साळुंखे प्रा. संजय हेरवाडे प्रा. अशोक पाटील प्रा.सुशांत पाटील, प्रा. राम पाटील, प्रा. स्वप्निल मेंडके, प्रा. नितेश रायकर, प्रा.धनाजी खतकर, प्रा. दिपाली सामंत, प्रा. मनीषा पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘