राष्ट्रपती पारितोषिकातून डॉ. दिगंबर प्रधान यांच्या प्रामाणिक सेवेचा गौरव- मंत्री मुश्रीफ

कागल / प्रतिनिधी : खाकी वर्दी अंगावर आल्यानंतर अधिकाराची मस्ती येण्याचे प्रकार पाहायला मिळतात; मात्र प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ. दिगंबर प्रधान यांनी आपल्या कार्यातून संवेदनशील अधिकारी म्हणून लौकिक मिळविला आहे. राष्ट्रपती पारितोषिकाने त्यांच्या प्रामाणिक सेवेचा झालेला गौरव  आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

Advertisements

सिद्धनेर्ली येथे ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रपती पारितोषिक विजेते आयपीएस अधिकारी डॉ. दिगंबर प्रधान यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते.

Advertisements

मंत्री मुश्रीफ म्हणाले,डॉ. प्रधान यांनी प्रामाणिकपणे केलेल्या सेवेची दखल राष्ट्रपती पारितोषिकाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या आयुष्यात यापेक्षा मोठा सन्मान असू शकत नाही.

सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रधान म्हणाले,वर्दी येते-जाते; मात्र माणुसकीचा ठसा कायम राहतो. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे काम करा, असा कानमंत्र राष्ट्रपती पारितोषिक विजेते आयपीएस अधिकारी डॉ. दिगंबर प्रधान यांनी दिला. ‘तुम्ही कितीही मोठे अधिकारी असा; त्याआधी तुम्ही माणूस आहात.पदापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे समाधान अधिक आहे.

Advertisements

अधिकाऱ्यापेक्षा माणूस म्हणून काम केले तर कौतुक निश्चित होते. चांगल्या कामाची प्रशासनातही दखल घेतली जाते.
यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

‘प्रधान यांनी लौकिक कृतीतून मिळविला’

ाजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, वर्दीची प्रतिष्ठा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संवेदनशील अधिकारी म्हणून डॉ. दिगंबर प्रधान यांनी लौकिक मिळविला आहे. त्यांच्या कार्याचा केवळ सिद्धनेर्लीकरांनाच नव्हे, तर तमाम कागलकरांना अभिमान आहे.
सत्कार सोहळ्यास रजनीताई मगदूम, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, एम. आर. चौगुले, माजी सरपंच एम. बी. पाटील, वाय. व्ही. पाटील, कृष्णात मेटील, राघू हजारे, दादासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ‘शाहू’चे संचालक सुनील मगदूम यांनी स्वागत केले. विलास पोवार यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!