मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फै नवीन एर्टिगा वाहनाचे वितरण

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल रौप्यमहोत्सवी व सर्वांच्या आपुलकी असलेली  श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत एर्टिगा या नवीन फोर व्हिलर वाहनाचे वितरण करण्यात आले.

Advertisements

    वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री . किरण गवाणकर यानीं दिली.

Advertisements

      याप्रसंगी संस्थेच्या वतीने जेष्ठ संचालक साताप्पा बापूसो पाटील यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आलेल्या वाहनाचे पुष्पहार घालून पूजन करण्यात येऊन वाहनाची चावी कर्जदार अभिजित प्रकाश केणे रा . गंगापूर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

   या गाडीच्या वितरण कार्यक्रम प्रसंगी सभापती किरण गवाणकर, उपसभापती प्रकाश सणगर, संचालक प्रशांत शहा, शशिकांत दरेकर, निवास कदम, किशोर पोतदार, नामदेवराव पाटील, हाजी धोंडीबा मकानदार, संदिप कांबळे, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर,  पासिंग ऑफिसर रणजीत मोरबाळे, विनायक हजारे, यांच्यासह शिवाजी तांबट, कर्मचारी वर्ग, सभासद उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!