मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व गावामधील प्रमुख पदाधिकारी व गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिमगाव रोडवरील भूते मंगल कार्यालय येथे निमंत्रित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस आधिकारी आप्पासो पवार विशेष मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मुरगूड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यानीं दिली.

गणेशोत्सव नियोजनबध्द , शांततेत व उत्साहात पार पडण्याच्या दृष्टिकोनातुन मुरगूड पोलिस ठाणे हद्दीतील सर्व नागरीक , ग्रामस्थ , संबधित घटक यांचे सहकार्य अत्यंत महत्वाचा असून त्या अनुषंगाने मुरगूड पालिका नगराध्यक्षा, सर्व नगसेवक , नगरसेविका , गावातील सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष , पोलिस पाटील , शांतता कमिटीचे पदाधिकारी, जेष्ठ नागरीक संघटना , गणेश मंडळाचे पदाधिकारी, डॉल्बी चालक व मालक, डिजिटल मिडिया रिपोर्टर, तसेच सर्व पत्रकार बंधू यानीं या बैठकीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यानीं केले आहे .