कोल्हापूर : कागल नगरपरिषदेच्या वतीने कै. व्ही. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र, पाझर तलाव परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील ‘कासव धबधब्यातील ‘रेन डान्स’ चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू समूह ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाडगे, माजी आमदार संजयबाबा घाडगे, प्रताप ऊर्फ भय्या माने, विरेंद्र मंडलिक, कागल नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण व कागल नगरपरिषदेचे नगरसेवक
सतिश घाडगे, दिपक मगर, सौ. संगीता रजपूत, सौ. सेहरनिदा मुश्रीफ, श्री. प्रकाश गाडेकर, श्री. अमित पिष्टे, सौ. सुवर्णा पिष्टे, श्रीमती रंजना सणगर, उमेश सावंत, सौ. मेघा माने, प्रविण काळबर, सौ. रझिया मुजावर, अरुण गुरव, अर्जुन नाईक, आनंदा पसारे, साधना पाटील, नवल बोते, सौ. सारिका बारड, सौ. सुमन गवळी
सुशांत कालेकर, पूनम मोरे, स्वरुपा जकाते, बाळासो माळी, अजय पाटणकर co, चंद्रकांत गवळी, सम्राट सणगर, संजय चितारी व नागरिक उपस्थित होते.
