वाघापूरात नागपंचमी उत्सवा निमित्त भक्तीला उधान

मडीगले (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र कर्नाटक तसेच गोवा राज्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंगाची नागपंचमी उत्सव सोमवार दिनांक 17 रोज संपन्न होत आहे दरम्यान आज रविवार यात्रेच्या मुख्य एक दिवस अगोदर भक्तांची मांदियाळी वाघापूरात  पहावयास मिळत आहे दरम्यान गेली आठ दिवस स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने संपूर्ण परिसराची स्वच्छता ,स्ट्रीट लाईट ,रस्ते,वहानतळ तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे सोमवार दिनांक 17 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे पाच वाजता पालकमंत्री श्री व सौ प्रकाश आबीटकर यांच्या शुभहस्ते अभिषेक व महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे

Advertisements

यात्रेसाठी भाविकांसाठी  गारगोटी आगारातून ज्यादा एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भुदरगड पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाघापूर… निढोरी.. मुरगूड तसेच मुरगूड… मुदाळतिट्टा.. कूर…ते वाघापूर अशा एकेरी महामार्ग राहणार असून भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सरपंच बापूसो आरडे , उपसरपंच सौ सुनीता शिंदे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे तसेच स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!