मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता . कागल येथील कन्या विद्या मंदिर या शाळेच्या व्यवस्थापन समितीची २०२६ ते २०२८ या कार्यकालासाठी पुनर्रचना झाली .यामध्ये अध्यक्ष पदासाठी आकाश श्रीकांत दरेकर तर उपाध्यक्ष पदासाठी अर्चना जितेंद्र खराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याचबरोबर सचिव पदी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंखे, शिक्षणतज्ञ म्हणून सुरेखा दिनकर रामशे, नगरसेविका नकेलीन जेरोन बारदेस्कर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून सुवर्णा आप्पा सोळांकुरे, परिचारक म्हणून शुभम बोताड, शशिकला समाधान बोते, प्रवीण सत्यजित घाटगे, कय्युम बाबासो पटेल, अनिल शामराव सुतार, नितीन चंद्रकांत कांबळे, राजेंद्र रत्नाप्पा कांबळे, इमरान गौस ताशिलदार यांचीही बिनविरोध सदस्य पदी निवड करण्यात आली

विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दिव्यांका गोविंद गावित व संस्कृती महेश मंडलिक यांची निवड झाली. वरील सर्व निवडी खेळीमेळीत पार पडल्या त्याचबरोबर गतवर्षीच्या समितीचा निरोप समारंभ यावेळी पार पडला .