पतपेढीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
सभासदांना १८ टक्के लाभांशा सह २ टक्के व्याज रिबेट देणार – चेअरमन हरिश्चंद्र साळोखे यांची घोषणा
मुरगूड (शशी दरेकर) : कागल येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी कागल या संस्थेची ९१ वी वार्षिक सर्व साधारण सभा मगर सांस्कृतिक सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात चेअरमन श्री. हरिश्चंद्र साळोखे,व्हा. चेअरमन सौ. वैशाली भारमल कोंडेकर व सुकाणु समिती सदस्य, संघटना प्रतिनिधी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आली. सभेच्या प्रारंभी संस्थेचे सभासद व देशातील विविध क्षेत्रातील दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी कागल शिक्षण विभागाने पाचवी ,आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खूप मोठे यश संपादित केले बद्दल कागलच्या प्रभावी गटशिक्षणाधिकारी मा. सारिका कासोटे मॅडम ,विस्तार अधिकारी श्री. आर.एस.गावडे साहेब यांचा यथोचित सत्कार करणेत आला.

चेअरमन श्री. हरिश्चंद्र साळोखे यांनी आपल्या प्रास्ताविकात शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या आपल्या संस्थेने अहवाल सालात सभासदांच्या जमा झालेल्या व्याजावर २ टक्के रिबेट , विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने पतपेढीने “सामाजिक कृतज्ञता निधी” योजना आणली आहे. अशा महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली.
संस्था सभासदांना ९ टक्के इतक्या अल्पदराने ३६ लाखापर्यंत कर्ज देते आहे. संस्थेकडे एकूण निधी ८ कोटी ६९ लाख इतका असून ठेवी १०८ कोटी ६७ लाख तसेच ९१ कोटी ७० लाखाचे कर्ज वाटप केले आहे. अहवाल सालात संस्थेचा एकूण व्यवसाय १२८ कोटी २२ लाख झाला असून काटकसरीच्या व पारदर्शक कारभारामुळे संस्थेस रुपये. ५३ लाख २५ हजार ३७० इतका निव्वळ नफा झाला असलेचे त्यानी सांगितले.
- PACKAGE INCLUDES : Pentonic Ball Pen Tumbler Pack. Ink Color: 32 Blue Ink, 15 Black Ink & 3 Red Ink, Body Color : Black,…
- SMOOTH WRITING FEELING : We Use Low Viscosity Ink For An Effortless Writing Experience. These Pens Are Designed For A Co…
- NO SMUDGE : Whether You’re In The Office Or Anywhere, You Don’t Have Time To Worry About A Messy Pen – Our Pens Are Desi…
संचालक मंडळाने मयत सभासद १०० टक्के कर्ज माफी योजना,सभासद भविष्य निधी योजना, दीपावली भेट वस्तू योजना ,संस्था कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा,इत्यादी योजना प्रभावी पणे राबवलेची माहिती दिली.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे माजी चेअरमन ,शाहू आघाडी प्रमुख, शिक्षक नेते श्री.सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतात संस्थेने सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून संस्थेचे कामकाज उत्तमरित्या सुरू असल्याचे सांगितले व समाधान व्यक्त केले. शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री.बाळासाहेब निंबाळकर यांनी संस्थेचा ताळेबंद योग्य असून संस्था आर्थिक दृष्ट्या भरभक्कम असल्याचे सांगितले.
सभेमध्ये राज्यस्तरीय विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवलेले सभासद शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक, विविध परीक्षा मार्गदर्शक शिक्षक, MPSC, वैद्यकीय क्षेत्र इत्यादी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या सभासद पाल्य यांच्यासह संस्थेचे कर्मचारी अनंत कुमार जोग यांचा गुणवंत कर्मचारी म्हणून यथोचित सत्कार करण्यात आला .
यावेळी सुकाणू समिती सदस्य के.डी.पाटील,प्रकाश चौगुले,अरविंद शिंदे,मोहन पाटील,प्रकाश मगदूम,आवेलीन देसा, आनंदा पाटील,संजय दाभाडे संघटना प्रतिनिधी जयवंत पाटील,सुनील चौगुले , सुरेश सोनगेकर ,नेताजी कमळकर, रविंद्र भोई, आनंदा गायकवाड एल.डी.पाटील ,संदीप पाटील संचालक जितेंद्र कुंभार,बाळासाहेब खामकर, तुकाराम इंगवले ,बाळासाहेब तांबेकर पी.आर.पाटील,विठ्ठल पाटील प्रदिप बुधाळे पाटील,रमेश कदम,आ. ल.कांबळे,रोहिणी लोकरे ,अनिल डवरी विष्णू तुकान , महादेव गुरव तज्ञ संचालक बाळासाहेब कवडे आदी प्रमुख उपस्थित होते.
सभासदांचे स्वागत व्हा. चेअरमन सौ .वैशाली भारमल यांनी केले.अहवाल वाचन व्यवस्थापक संताजी पाटील यांनी केले. संचालिक सौ.रोहिणी लोकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जाधव, भरत कदम यांनी केले. सभेसाठी ६०० हून अधिक सभासद उपस्थित होते.