वाघापूरच्या विठ्ठल बिरदेव ओवीकार मंडळाकडून टेंभुर्णी येथे बाळूमामाच्या तळावर हरिजागर

मडीलगे (जोतीराम पोवार) – वाघापूर तालुका भुदरगड येथील विठ्ठल बिरदेव बाळूमामा ओविकार मंडळाकडून बाळूमामाच्या बगा क्रमांक 15 टेंभुर्णी तालुका पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त धनगरी गाण्यांच्या ओव्यातून नुकताच हरी जागर मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला.

Advertisements

यावेळी वाघापूरचे सुप्रसिद्ध ओविकार रामचंद्र डोणे, शिवाजी डोणे, सत्याप्पा डोणे लक्ष्मण पडवळे, विठ्ठल पडवळे, यांनी बाळूमामाच्या जीवन चरित्र पट उघडताना माणसाच्या जीवनातील गुरुचे महत्त्व अधोरेखित करताना बाळूमामा व मुळे महाराज या गुरु शिष्यातील सहवास, गुरु मुळे बाळूमामांना मिळालेली प्रेरणा व जीवन प्रवास अत्यंत शिस्तबद्धपणे आपल्या धनगरी ओव्यांच्या माध्यमातून मामांच्या भक्तगणांना ज्ञात केले यावेळी लाखो भाविकांनी या ओविकार मंडळाची प्रशंशा करताना यथोचित सन्मान केला.

Advertisements

तत्पूर्वी पहाटे पालखी स्थळ प्रमुख कारभारी राजेंद्र वाघमोडे यांच्या उपस्थितीत मामांच्या मूर्तीस अभिषेक, पाद्यपूजा, धुपारत, तसेच नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय या जप माळेने परिसर दुमदुमून गेला  यानंतर महाआरती भजन कीर्तन पालखी मिरवणूक, आतषबाजी तसेच भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली यानंतर पंढरपूर पासून जिल्ह्यातील लाखो भाविक भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दरम्यान साके तालुका कागल येथील तब्बल दीडशे तरुणांनी मामांच्या शेळ्या मेंढ्यांची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करून सेवा बजावल्याबद्दल उपस्थित भाविकातून समाधान व्यक्त होत होते. यावेळी कृष्णात जठार, रंगराव दाभोळे यांच्यासह आदमापूर परिसरातील वाघापूर, मुदाळ, व्हनगुती, कुरणी, बिद्री येथील मामांचा भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!