कागल: कागल शहरातील लोहार गल्ली येथे राहत्या घराची भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उर्मिला उदय कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव आहे.
Advertisements
बुधवारी रात्री साधारण १०.४५ च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. अचानक घराची भिंत कोसळल्याने उर्मिला कुलकर्णी यांच्या अंगावर पडली, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
Advertisements


त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
