कागल ( विक्रांत कोरे): करनूर ता. कागल येथून पाणी गरम करण्याचे पितळी दहा बंब चोरीस गेले. हा प्रकार रविवार दि. 27 रोजी रात्री च्या दरम्यान घडला.चोरीचे ब-याच दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकातून भितीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या दोन वर्षापासून करनूर मध्ये कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या चोरीचे सत्र चालू आहे. यामध्ये दोन ते तीन जातिवंत म्हैशी रात्रीत अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे . आज तागायत त्या चोरीचा छडा लागलेला नाही.
दरम्यान नागरिकांनी आंघोळीचे पाणी गरम करुन दारात ठेवलेले आठ ते दहा बंब रविवार दि 27 रोजी रात्री चोरट्यांनी लांबविले.त्याची अंदाजे 50 हजार रुपये किंमत होते.
गेल्या दोन वर्षापासून चोरीचे सत्र चालू असल्याने करनूर मधील नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. कागल पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.