एन एम एम एस मध्ये मुरगुड विद्यालयाचे २५ विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक

तब्बल बारा लाखाची शिष्यवृत्ती, कागल तालुक्यात प्रथम क्रमांकाचा निकाल

मुरगूड (शशी दरेकर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन एम एम एस २०२५ / २६) मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड ता. कागल मधील आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. तब्बल २५ विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक बनले असून कागल तालुक्यात प्रथम क्रमांकाने निकाल लागल्याने पालक शिक्षक विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Advertisements

गेले तीन वर्ष एन एम एम एस निकालाची परंपरा विद्यालयाने याही वर्षी कायम राखली आहे. या २५ विद्यार्थ्यांना चार वर्षात १२ लाखाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली . आत्तापर्यंत मुरगुड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सव्वा कोटीची शिष्यवृत्ती मिळवली आहे. यावर्षीच्या निकालात चे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याची मेरिट वाढले आहे .यावर्षी या शाळेचे १०० गुणांच्या  वरती १२७ विद्यार्थी आहेत.

Advertisements

        यावर्षी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये…आराध्या प्रदीप सोरप १६० गुण (मुरगूड),राधिका सूर्यकांत वळीवडे १५५ गुण (चिमगाव), पृथ्वीराज रणजीत कापसे १५२ गुण (मुरगूड),स्वरांजली सागर पाटील १५१ गुण (यमगे ),स्वरांजली गणेश लाड १५१ गुण (करंजीवणे),पायल अमर ढेरे १४७ गुण (मुरगूड),गुरुराज गजानन खराडे १४४ गुण (शिंदेवाडी),समृद्धी संतोष मोरे १४३ गुण (मुरगूड),सोहम सागर पाटील १४२ गुण (सुरुपली),वरद अनिल कानकेकर १४१ गुण (राधानगरी),स्वरांजली जयवंत रामाने १४१ गुण (कुर),साईनाथ गणपती कमळकर १३९ गुण (सुरुपली), विजया सागर मगदूम १३९ गुण (केनवडे), सुयश संभाजी खतकर १३९ गुण ( भडगाव ),स्नेहलता बळवंत एकल १३७ गुण (चिमगाव),वैष्णव प्रमोद चौगुले १३७ गुण (भडगाव),वैष्णवी सतीश वडर १३६ गुण (निढोरी ),समर्थ पांडुरंग पाटील १३५ गुण (मळगे खुर्द),

प्रणाली रामचंद्र पाटील १३४ गुण(सुरुपली),रविराज ज्योतीराम वाघमोडे १३२ गुण (वाघापूर),अनिल दगडू डोणे १३२ गुण (यमगे ),समरजीत भरत लाड १३२ गुण (मुरगूड),उद्धव मारुती पुरीबुवा १२९ गुण (चिमगाव),श्रेयश विशाल पवार १११ गुण (निढोरी),सुजित सूर्यकांत डवरी ७६ गुण (हमीदवाडा) यांचा समावेश आहे.

      या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई,युवा नेते कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे,कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर,शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील, उपप्राचार्य व्ही. जी.घोरपडे, उपमुख्याध्यापक एस. बी. सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस. डी. साठे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे, बी.के वाघमोडे, एम. एस. कांबळे, एन एम एम एस विभाग प्रमुख अनिल पाटील यांचे प्रोत्साहन व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

error: Content is protected !!