मुरगूड ( शशी दरेकर ):- आगामी रमजान ईद, बलिदान मास व रंगपंचमी सण उत्सव या अनुषंगाने आज दिनांक ०७-०३-२०२६ रोजी १० ते ११.०५ वा मुदतीत एसटी स्टँड मुरगुड* परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड – तुकाराम चौक- जमादार चौक- पाटील कॉलनी- शिवतीर्थ मुरगूड – मुरगूड नाका- मुख्य बाजारपेठ – कबरस्थान मशीद रोड मुरगूड अशा मार्गे कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला. सदर दंगल काबू योजना व रूट मार्च करिता मुरगुड पोलीस ठाणे कडील १अधिकारी, १८ पोलिस अमलदार व २२ होमगार्ड सहभागी झाले होते.
तसेच मुरगूड ग्रामीण रुग्णालय कडील वैद्यकीय अधिकारी व ॲम्बुलन्स पथक, मुरगुड नगरपरिषद कार्यालयाकडील अग्निशामक दल पथक उपलब्ध ठेवण्यात आलेले होते. सदरची रंगीत तालीम घेऊन सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार व उपस्थित लोकांना रंगीत तालीम चा आशय व उद्देश समजावून सांगितला.
