कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धेत कै. पै.आनंदा मांगले स्पोर्ट्स विरेंद्र चषकाचा मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ): युवा नेते वीरेंद्रभैया मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल प्रीमियर लीग स्पर्धेत मुरगूडच्या कै.पै.आनंदा मांगले स्पोर्ट्स ने प्रथम क्रमांकाचा विरेंद्र चषक पटकावला.

Advertisements

     अंतिम सामन्यात आनंदा मांगले स्पोर्टस्‌ने सयाजी फिटनेस संघाला पहिल्या सेटमध्ये २६ – २४ अशी मात दिली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये सयाजी फिटनेस संघाने मांगले स्पोर्टस् चा २५ – २३ असा पराभव करीत बरोबरी साधली. निर्णायक अन चुरशीच्या झालेल्या तिसऱ्या सेटमध्ये १६ – १४ असा पराभव करीत मांगले स्पोर्टस् ने प्रथम क्रमांक पटकावला. मांगले स्पोर्टस् च्या हर्ष कांदळकरच्या पासवर राष्ट्रीय खेळाडू करण मांगले, ऋषी चव्हाण यांनी सयाजी फिटनेस संघाच्या राष्ट्रीय खेळाडू ओंकार लोकरे,  गिरीश खामकर, आदित्य कागवाडे यांचा कडवा प्रतिकार मोडून काढत मांगले स्पोर्टस्  संघाला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला.

Advertisements

            स्पर्धेत द्वितीय क्रमांक – सयाजी फिटनेस मुरगूड, तृतीय क्रमांक – अभिजीत पाटील फ्रेंड सर्कल मुरगड या संघानी पटकावले आहेत. वैयक्तिक पारितोषिके मॅन ऑफ द सिरीज – करण मांगले मुरगूड, बेस्ट ब्लॉकर -ऋषी चव्हाण कोल्हापूर, बेस्ट स्मॅशर : विक्रम रानमाळे मुरगूड, बेस्ट लिफ्टर -जीवन पवार (ईश्वरपूर), बेस्ट लीबेरो – सुहास भारमल (मुरगूड) यांनी पटकावली आहेत. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण मोरबाळे, विनोद रणवरे, शहानवाज मोमीन यांनी काम पाहिले. नंदू चौगले, करण मांगले व निखील पाटील यांनी समालोचन केले.

             बक्षीस वितरण नगरसेवक सुहास खराडे, एस व्ही चौगले, संभाजी आंगज, महादेव कानकेकर, सुनील रणवरे, दिपक माने, दिपक शिंदे, राहुल शिंदे, सुनील मंडलिक, सर्जेराव पाटील, दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर भाट,अभिषेक भोसले, करण भोसले यांच्यासह राणा प्रताप क्रीडा मंडळ व राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लब मुरगूड यांनी परिश्रम घेतले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!