कागलमध्ये वैचारिक जागर! २१ वी ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाला’ १७ जानेवारीपासून

कागल (विशेष प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाला’ (वर्ष २१ वे) आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. १७ जानेवारी ते बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही व्याख्यानमाला संपन्न होणार असून, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कागलकरांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे.

Advertisements

उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती

या व्याख्यानमालेचे उद्घाटन शाहू ग्रुपचे अध्यक्ष मा. समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते होणार असून, समारोप महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. हसनसाहेब मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी शहरातील इतर प्रमुख मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

Advertisements

व्याख्यानमालेचे वेळापत्रक आणि विषय

पाच दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध विषयांवर नामवंत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत:

Advertisements
अ.क्र.वार व दिनांकव्याख्यात्यांचे नावविषय
१.शनिवार, १७/०१/२०२६डॉ. मनिषा भोजकर, कोल्हापूरआनंदी आणि तणावमुक्त जीवन
२.रविवार, १८/०१/२०२६मा. कृष्णात पिंगळे, पुणे (DCP)स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास
३.सोमवार, १९/०१/२०२६मा. संजय आवटे, पुणेचला उभारू नवी पिढी
४.मंगळवार, २०/०१/२०२६मा. रणजीत आशा अंबाजी, कोल्हापूरजगण्यासाठी हसा आणि हसवण्यासाठी जगा
५.बुधवार, २१/०१/२०२६प्राचार्य यशवंत पाटणे, साताराविवेकदिव उजळूया

कार्यक्रमाची वेळ आणि स्थळ

  • स्थळ: हिंदुराव घाटगे शाळा पटांगण, थोर साहित्यिक साने गुरुजी खुले विचार मंच, खर्डेकर चौक, कागल.
  • वेळ: दररोज सायंकाळी ठीक ६:०० वाजता.
    कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. अजय पाटणकर, नगराध्यक्षा मा. सविता प्रताप माने, उपनगराध्यक्ष मा. जयवंत रावण आणि सर्व नगरसेवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमासाठी शाहू नगर वाचनालय व नगरपरिषद कर्मचारी वृंदाचे विशेष सहकार्य लाभले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!