मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील नवोदित लेखक, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज ज्युनिअर कॉलेजमधील सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. रवींद्र बाबुराव शिंदे यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून रविवार दि. ११ पासून प्रसारित होणार आहेत.
रविवार दि. ११ डिसेंबर ते गुरुवार दि. १५ डिसेंबर या सलग पाच दिवसाच्या कालावधीत रोज सकाळी ७ वाजता कोल्हापूर आकाशवाणीवरील ‘ऐसी अक्षरे रसिके’ या सदरामध्ये आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे विविध विषयांवर वैचारिक बंध प्रसारित होणार आहेत.

समाजातील विविध नामवंत लेखकांचे वैचारिक लेख या सदरामध्ये प्रसारित होत असतात. प्रा. शिंदे यांनी अनेक वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे विविध विषयांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सूत्रसंचालन ही केले आहे.