मुरगूडच्या एम जे लकी इंटरनॅशनल स्कूलला कागल तालुक्याचे संगणक परीक्षा केंद्राची मंजुरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुरगूड येथील एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल ला संगणक टायपिंग चे कागल तालुक्याचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष व्ही आर भोसले यांचे हस्ते आणि एम जे इंटरनॅशनल चेअरमन हाजी धोंडीराम मकानदार यांच्या उपस्थितीत पूजन करून व फित कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisements



     तालुक्यातील ४०० संगणक परीक्षार्थीं या केंद्रावर परीक्षा देतील.५ ते १० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परीक्षा केंद्राचे  केंद्रप्रमुख म्हणून एम जे च्या प्राचार्या जस्मिन जमादार या काम पाहतील.तसेच पर्यवेक्षक म्हणून सौ. ऋतुजा मोरबाळे, टेक्निशियन म्हणून रोहन पाटील, बायोमेट्रिक अटेंडंट चंद्रसेन घोरपडे, जि.प.प्रतिनिधी टेक्निकल असिस्टंट अजित पाटील यांनी काम पाहिले.

Advertisements

     यावेळी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन धोंडीराम मकानदार म्हणाले विद्याथ्र्यानां विविध क्रिडाक्षेत्रात प्राविण्य मिळवून त्यानां नावलौकिक मिळावा म्हणून स्वमालकीचे सुसज्य असे स्कूलच्या माध्यमातून क्रिडांगणाचे काम सुरू आहे. प्रत्येक शिक्षण क्षेत्रात इंटरनॅशन स्कूल प्रगतीच्या दिशेने भरारी घेत आहे . या दृष्टीने स्कूल प्रयत्नशिल आहे असे त्यानीं सांगितले. स्वागत सुनिल पाटील सर यानीं केले. तर आभार जस्मिन जमादार यानीं मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!