मुरगूड येथे गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्य  युवकांची स्वच्छता मोहिम

मुरगूड ( शशी दरेकर )

अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेने ग्रासलेल्या या समाजाला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी खूप प्रयत्न केले.
सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मुरगूड मधील युवकांनी दत्त मंदिर, नदी घाट परिसर, स्मशानभूमी आणि परिसर गाव तलाव परिसर, ऑक्सीजन पार्क परिसराची स्वच्छता केली.

      यावेळी मोठ्या प्रमाणात जमा झालेला कचरा बाहेर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच गाव तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता तो कचरा बाहेर घेऊन येत त्याचीही योग्य ती विल्हेवाट लावली. तब्बल दोन ट्रॉली कचरा या युवकांनी बाहेर काढला. गावतलाव सभोवती स्वच्छता करून तो परिसर आणि संपूर्ण  ऑक्सिजन पार्क आणि परिसराची स्वच्छता करून तो संपूर्ण परिसर चकाचक करून टाकला.

Advertisements


सकाळी मोठ्या प्रमाणात थंडी असूनही या युवकांनी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तब्बल तीन तास स्वच्छता मोहीम राबवून गाडगेबाबा यांना आदरांजली वाहिली.

फिरायला येणाऱ्या नागरिकांनी या युवकांचे कौतुक केले. यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते तानाजी भराडे, अमोल मेटकर ,नामदेव भराडे, बाळासो भराडे, शिवाजी चौगले, आनंदा रामाने, संकेत शहा, प्रफुल कांबळे, प्रकाश पारिषवाड, अमर सुतार, आनंदा मोरे, भैरू बेलेकर, जगदीश गुरव रघुनाथ, बोडके, धनंजय सूर्यवंशी, विनायक मेटकर या युवकांनी स्वच्छता मोहिम राबविली.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!