मुरगूडच्या जेष्ठ नागरीक संघात महात्मा फुले पुण्य दिन साजरा …
मुरगूड ( शशी दरेकर )
महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक , धर्म चिकित्सा, अस्पृश्यता निर्मुलन , उद्योग व्यापार, अंधश्रद्धा निर्मुलन इ. क्षेत्रांत समाज जागृती करून समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे थोर कार्य फुले यानीं केले. यांच्या या कार्यामुळे ते महात्मा या पदावर पोहोचले.
आज साक्षर, सुशिक्षित, व उच्चविद्या विभूषितांनी त्यांचा मार्ग अनुसरून अवैज्ञानिक व धर्मभोळेपनाचा त्याग करून चिकित्सक पद्धतीने अभ्यास करुन समाजास जागृत करण्याची आवश्यकता आहे असे परखड विचार मांडले.


पुढे ते म्हणाले वर्तमानपत्रातून व त्यास बळी पडण्याऱ्या समाजाच्या बातम्या पाहता समाजाचे मोठया प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे वाटते.
मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात महात्मा फुले स्मृतिदीनाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखाराम सावर्डेकर होते.
यावेळी प्रतिमा पूजन संघाचे संचालक सिकंदर जमादार यांचे हस्ते करण्यात आले. दिपप्रजलन उपस्थित जेष्ठांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संघाचे पदाधिकारी जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटीआभार संचालक एम.टी. सामंत यानीं मानले.