सुहासिनी प्रविणसिंह पाटील शिवसेना तिकिटावर नगराध्यक्ष लढवणार
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड नगरपालिकेत भाजपा, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी लढणार असे चित्र आज स्पष्ट झाले. मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज भारतीय जनता पक्षाचे नेते मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या पत्नी सौ सुहासिनी प्रविणसिंह पाटील याना शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या (राजे मुश्रीफ गट) वतीने मुरगूड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या पत्नी तसनीम राजेखान जमादार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटातर्फे तर्फे माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी सौ सुहासिनी प्रविणसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर करताना ते म्हणाले की सौ सुहासिनी पाटील या महाराष्ट्रात उच्चांकी मताने निवडून येतील . श्री मंडलिक यांनी कार्यकर्त्यांच्या समोर प्रवीणसिंह पाटील यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले
आता आपली सर्वांची जबाबदारी आहे, शिवसेना भाजप युतीचाच नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे. त्यासाठी आपण सर्वजण जिवाचे रान करु. यावेळी भाजापाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकूळ संचालक अंबरिष घाटगे , बिद्रीचे संचालक भूषण पाटील, ॲड वीरेंद्र मंडलिक , दिग्वीजय पाटील, माजी नगराध्यक्ष नामरेवराव मेंडके, एस व्ही चौगले, राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ पुजारी, संजय मोरबाळे, जयसिंग भोसले, सत्यजित पाटील, सम्राट मसवेकर आदी हे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.