शिवप्रेमी धोंडीराम परीट यांचा आगळावेगळा उपक्रम
मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड बाजारपेठ येथे शिवप्रेमींच्या वतीने दि, १९ फ्रेबुवारी _ २०२२ रोजी सकाळी ठिक१o वाजता ” मोलकरीन महिलांचा सत्कार ” करण्यात येणार आहे.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मा .सौ. अक्षता नितिकेश पाटील यांच्या शुभहस्ते होईल. त्यानंतर ” मोलकरीन महिलांचा सत्कार समारंभ होईल, मुरगूड बाजारपेठेतील शिवप्रेमी श्री .धोंडीराम परीट ( जयमहाराष्ट्र ) हे शिवजयंतीला असे वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवित आले आहेत.
या कार्यक्रमासाठी सौ. सुप्रिया राजेंद्र भाट (नगरसेविका), सौ. सुनंदा सुरेश जाधव , सौ. सुनंदा मगदूम, सौ. गिता दरेकर, सौ. निलवेलीन फर्नांडिस, सौ. मरीयम शेख, सौ. राजश्री कापशे, श्री. बाजीराव गोधडे (नगरसेवक), श्री. सदानंद मिरजकर, श्री. एम्. टी. सावंत ( सर ), श्री. तुकाराम परीट ( पोलिस पाटील) , श्री. शरद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शिवप्रेमीनी हजर रहावे असे आवाहन शिवप्रेमी श्री. धोंडीराम परीट यानी केले आहे.